इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे औसात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST2021-07-04T04:14:41+5:302021-07-04T04:14:41+5:30

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात माजी नगराध्यक्ष जावेद ...

Nationalist agitation of NCP against fuel price hike | इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे औसात आंदोलन

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे औसात आंदोलन

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात माजी नगराध्यक्ष जावेद शेख, माजी नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, नगरसेवक रूपेश दुधनकर, शाकेर सय्यद, साजीद काझी, विनायक सूर्यवंशी, फहाद अरब, ज्येष्ठ नेते डॉ. नजीर शेख, युनूस चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष वकील इनामदार, युवक तालुका कार्याध्यक्ष अविनाश टिके, युवक शहराध्यक्ष संतोष औटी, युवक शहर कार्याध्यक्ष संगमेश्वर उटगे, सेवा दल शहराध्यक्ष कृष्णा सावळकर, ॲड. अजिंक्य फत्तेपूरकर, मुकेशसिंग तोवर, सुमित दीक्षित, गजेश्वर शिंदे, आनंद बनसोडे, विजय कांबळे, बिलाल सिद्दिकी, अल्ताफ सय्यद, मिनाज इनामदार, आदी सहभागी झाले होते.

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या सततच्या दरवाढीविरोधात आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोटारगाडीस दोरीने पेट्रोल पंपापर्यंत ओढत नेऊन केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

Web Title: Nationalist agitation of NCP against fuel price hike