शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांना महावितरणचा असाही ‘शाॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : रिडिंगअभावी सरासरी बिले ग्राहकांच्या हाती ठेवण्यात आल्याने लातूर परिमंडळातील लातूर, उदगीर, निलंगा विभागातील शेकडो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : रिडिंगअभावी सरासरी बिले ग्राहकांच्या हाती ठेवण्यात आल्याने लातूर परिमंडळातील लातूर, उदगीर, निलंगा विभागातील शेकडो ग्राहक त्रस्त झाले आहेत. ज्यादा बिले आल्याने ग्राहक तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. मात्र समाधान काही होत नसल्याचे चित्र आहे.

महावितरणच्या लातूर परिमंडळात एकूण ५ लाख १२ हजार ८८२ वीज ग्राहकांची संख्या आहे. यातील तब्बल ३ लाख ४० हजार ५३९ घरगुती ग्राहक आहेत. गेल्या सहा महिन्यापासून या ग्राहकांच्या मीटरची रिंडिगच कोणी घेत नसल्याचे त्रस्त झालेल्या ग्राहकांतून सांगितले जात आहे. अचानकपणे आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलामुळे हे ग्राहक त्रस्त झाले आहेत. आपल्याला आलेले वीजबिल चुकीच्या पद्धतीने आले आहे. आपल्या मीटरची तपासणी करण्यात यावी. रिडिंगची पाहणी करण्यात यावी, प्रत्यक्ष वापर झालेल्या रिडिंगची नोंदणी करावी, अशा आशयाच्या तक्रारी वीज ग्राहकांनी संबंधित कार्यालयाकडे केल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात अनेक दुकानदारांची दुकाने बंद होती. त्यामुळे वीज वापरण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका व्यापा-यांनी मांडली आहे. मात्र वीजबिल भरण्यासंदर्भात तगादा लावला जात आहे. अनेक तक्रारींचा अद्यापही निपटारा झाला नाही. अनेक तक्रारी अद्यापही त्या-त्या कार्यालयात पडून आहेत.

रिडिंग न घेता सरासरी बिलांचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. यातून वीजग्राहक त्रस्त आहेत. याबाबत तक्रार केली तरी समाधानकारक उत्तर मिळत नाही. केवळ टप्प्याटप्प्याने वीज बिल भरण्याचा सल्ला दिला जातो. यातून वीजग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

- बालाजी पाटील, वीज ग्राहक

घरगुती आणि शेतीसाठी लागणा-या कृषी पंपाची वीजबिलेही सरासरी दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही तोडगा निघत नाही. शेवटी बिल भरण्याचा सल्ला दिला जात आहे. यातून महावितरणने मार्ग काढावा.

- अंगद किनीकर, वीज ग्राहक