उड्डाणपुलाच्या कामासाठी मनसेचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST2021-09-21T04:21:59+5:302021-09-21T04:21:59+5:30

यावेळी तालुकाध्यक्ष सूर्यकांत शेवाळे, उपाध्यक्ष तुळशीदास माने यांची उपस्थिती होती. चापोली येथे होणाऱ्या नियोजित उड्डाणपुलामुळे गावातील व परिसरातील जनतेला ...

MNS Rasta Rocco movement for flyover work | उड्डाणपुलाच्या कामासाठी मनसेचे रास्ता रोको आंदोलन

उड्डाणपुलाच्या कामासाठी मनसेचे रास्ता रोको आंदोलन

यावेळी तालुकाध्यक्ष सूर्यकांत शेवाळे, उपाध्यक्ष तुळशीदास माने यांची उपस्थिती होती. चापोली येथे होणाऱ्या नियोजित उड्डाणपुलामुळे गावातील व परिसरातील जनतेला समस्यांना प्रतिदिन सामोरे जावे लागणार आहे. व्यापार, शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, स्मशानभूमी येथे रहदारीसाठी अडचणी निर्माण होऊन दोन बाजूंच्या जनतेचा संपर्क तुटणार आहे. रोडच्या एका बाजूला जास्त तर एका बाजूला कमी अधिग्रहण केले जात आहे. त्यामुळे चापोलीतील उड्डाणपुलाला एक नाही तर किमान चार बोगदे सोडावे व चापोलीतील जनतेला रोजच्या विविध समस्यांपासून वाचवावे, यासाठी मनसेने हे आंदोलन केले.

बोगदे न वाढविल्यास कामबंद आंदोलन...

चापोली गावचे मार्केट जर महामार्ग प्राधिकरण एक-दोन बोगद्यांसाठी उद्ध्वस्त करून जनतेला वेठीस धरणार असेल तर कामबंद आंदोलन हातात घेऊ, असे जिल्हाध्यक्ष डॉ. भिकाणे यांनी सांगितले. आंदोलनात शंकर पाटील, बस्वराज होनराव, कृष्णा गिरी, नरसिंग शेवाळे, चंदू मलीशे, दगडू शेवाळे, मालू कोरे, युनूस शेख, मधुकर जगदाळे, बालाजी कासले, संतोष गडदे, बालाजी तेलंगे, मच्छिंद्र शेवाळे, तुकाराम माळी, हरीश कांबळे, दीपक आबंदे, चंदू स्वामी, सचिन शंकरे, रोहिदास वाघमारे, सिद्धेश्वर माने, राम माने, शुभम कासनाळे, शीलाबाई भोसले, सुनीताबाई सरकाळे, शोभाबाई सरकाळे, पारुबाई भोसले, छायाबाई भालेराव, कोंडाबाई सरकाळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: MNS Rasta Rocco movement for flyover work