चापोलीत मनसेचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:23+5:302021-09-07T04:25:23+5:30

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली येथील हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सूर्यकांत शेवाळे, उपाध्यक्ष ...

MNS bell rings in Chapoli | चापोलीत मनसेचा घंटानाद

चापोलीत मनसेचा घंटानाद

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली येथील हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष सूर्यकांत शेवाळे, उपाध्यक्ष तुळशीदास माने, कृष्णा गिरी, राजकुमार हादवे, शंकर पाटील, सिध्देश्वर माने, युनुस शेख, नयन माने, नामदेव पांचाळ, बस्वराज होनराव, प्रवीण माने, सतीश जगदाळे, रमेश चव्हाण, बालाजी बोईनवाड, पंढरी पवार, बळीराम शेवाळे, मधुकर जगदाळे, मन्मथ स्वामी आदी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी डॉ. नरसिंह भिकाणे म्हणाले, देशातील दुसऱ्या राज्यांमध्ये मंदिरे उघडी आहेत. परंतु महाराष्ट्र सरकार कोविडच्या नावाखाली भाविक, भक्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामीण भागात कोविड रुग्ण संख्या कमी झाली असताना व बहुतांश नागरिकांचे कोविड लसीकरण झाले असतानाही मंदिर उघडण्यात येत नाही. किमान लसीकरण झालेल्या व्यक्तींना तरी देवदर्शनाची परवानगी द्यावी, असेही ते म्हणाले.

Web Title: MNS bell rings in Chapoli