शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरात अनेकांच्या भागात घरांत शिरले गटारीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

नगरपालिकेच्या दुर्लक्षाचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. शहरात सोमवार रात्रीपासून संततधार पाऊस पडत असल्याने शहरातील ग्रामीण रुग्णालयात अराफत ...

नगरपालिकेच्या दुर्लक्षाचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. शहरात सोमवार रात्रीपासून संततधार पाऊस पडत असल्याने शहरातील ग्रामीण रुग्णालयात अराफत कॉलनीतही काही घरांत नालीचे पाणी

घुसले आहे. तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे खासगी रुग्णालय आहेत. भागात रस्त्यावर गुडघाभर नालीचे पाणी साचल्याने दवाखान्यात जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. शहरात झालेल्या पावसाने नालीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. येथील नाल्यांची साफसफाई दोन-तीन महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. वारंवार कल्पना देऊनही नगरपालिका कार्यालयाने दुर्लक्ष केले. याचे परिणाम मात्र सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. शहरातील अनेक भागांतील नाल्यांत कचरा जमा झाल्याने त्याचे पाणी जागेवर साचून राहते. नगरपालिका कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

अनेकांच्या घरांसमोर साचले पाणी

शहरात घरांच्या सभोवताली पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर निघण्यास अडचण होत आहे. नगरपालिकेने रस्ते व नाल्याची योग्य विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी अनेकांच्या घराच्या सभोवताली पसरले आहे. नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत रस्त्यावर निघावे लागते आहे. पाणी निचराअभावी संकट ओढावले आहे. नागरिकांच्या मूलभूत सोयीकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

अतिक्रमण केल्याने स्वच्छता करता येईना...

शहरातील कराडनगर भागातील नालीवर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले असल्याने या भागातील नालीचे साफसफाई करता येत नाही. संबंधित दुकानदारांनी नालीवरचे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या भागात नालीचा कचारा काढण्यात येत आहे.

-त्र्यंबक कांबळे,

मुख्याधिकारी, नगरपालिका, अहमदपूर

फोटो कॅप्शन :

१ ) कराडनगर भागात आसेफ शेख यांच्या घरात नालीचे पाणी घुसल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूचे नुकसान झाले आहे.

२ ) शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स भागात नालीचे पाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

३ ) शहरातील कराडनगर भागात घरांच्या समोर असे पाणी साचले आहे.