अकरा पथकांकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST2021-09-24T04:23:44+5:302021-09-24T04:23:44+5:30

विनातिकीट प्रवास केल्यास दुप्पट भाडे, दंड... लातूर विभागांतर्गत वेगवेगळ्या मार्गांवर १५ दिवस प्रवासी तिकिटाची तपासणी केली जाणार आहे. या ...

A look at the insect travelers from the eleven squads | अकरा पथकांकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर नजर

अकरा पथकांकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर नजर

विनातिकीट प्रवास केल्यास दुप्पट भाडे, दंड...

लातूर विभागांतर्गत वेगवेगळ्या मार्गांवर १५ दिवस प्रवासी तिकिटाची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीमध्ये विनातिकीट प्रवास करताना आढळून आल्यास संबधित प्रवाशाकडून दुप्पट भाडे अथवा दंडाची रक्कम त्यापेक्षा अधिक असेल तर वसूल केली जाणार आहे. २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहील. लातूर विभागातील वेगवेगळ्या मार्गांवर अचानक बस थांबवून तपासणी केली जाणार आहे. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक

प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम...

एसटीचा प्रवास फुकट करू नये, त्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविली जात असून, लातूर जिल्ह्यातील पाच आगारांत प्रत्येकी पाच पथके आणि विभागस्तरावरची सहा पथके या तपासणी मोहिमेत असणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक क्षीरसागर यांनी दिली.

Web Title: A look at the insect travelers from the eleven squads