शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरचा मोठा निकाल! पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत, भाजपच्या प्रेरणा होनराव विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:45 IST

काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला

लातूर: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज माजी महापौरांच्या प्रतिष्ठेचा फैसला झाला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून झालेल्या पाच महापौरांपैकी चार जण यावेळेस रिंगणात होते. मात्र, मतदारांनी अनुभवापेक्षा रणनीती आणि नवीन समीकरणांना पसंती दिल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून, भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी त्यांना धूळ चारली आहे.

माजी महापौरांचे नशीब काय सांगते? लातूरच्या राजकारणात 'पॉवरफुल' मानले जाणारे चारही माजी महापौर मूळचे काँग्रेसचेच. मात्र, या निवडणुकीत सर्वांच्या वाटा वेगळ्या होत्या.

विक्रांत गोजमगुंडे (विजयी): निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश केलेल्या गोजमगुंडे यांनी प्रभाग ५ मधून ४,७२९ मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर मतदारांनी विजयाची मोहोर उमटवली आहे.

ॲड. दीपक सूळ (विजयी): काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी महापौर दीपक सूळ यांनी प्रभाग १० मधून ५,४५१ मते घेत आपला दबदबा कायम राखला आहे.

प्रा. स्मिता खानापुरे (पराभूत): प्रभाग १५ मध्ये काँग्रेसकडून लढणाऱ्या स्मिता खानापुरे यांना भाजपच्या प्रेरणा होनराव (४,२४५ मते) यांनी पराभूत केले. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सुरेश पवार: प्रभाग ६ मधून शिंदेसेनेकडून नशीब आजमावत असलेल्या माजी महापौर सुरेश पवार यांच्या निकालाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

पक्षांतराची चुरस अन् काँग्रेसचे पारडे जड या निवडणुकीत माजी महापौर सुरेश पवार यांनी भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदेसेना गाठली होती, तर गोजमगुंडे यांनी 'हात' सोडून 'घड्याळ' बांधले होते. या राजकीय कोलांटउड्यांमध्ये गोजमगुंडे यशस्वी ठरले आहेत. शहरात एकूण १८ प्रभाग असून, ७० जागांसाठी लढत होत आहे. या निवडणुकीत एकूण ३५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार काँग्रेस आणि वंचित आघाडीची युती ३३ जागांसह आघाडीवर आहे, तर भाजप १७ जागांवर तर राष्ट्रवादी ( अप) पक्ष एका जागेवर विजयी झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Election Upset: Former Mayor Khanapure Loses; Honrao Wins

Web Summary : Latur's election saw a major upset as former mayor Smitha Khanapure lost to BJP's Prerna Honrao. Other former mayors had mixed fates, with some winning after switching parties. Congress and allies lead with 33 seats.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी