शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला मिळणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गाची महापौर; काँग्रेसच्या 'या' तिघींमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:33 IST

कोण होणार लातूरची महापौर? काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

लातूर: लातूर महानगरपालिका निवडणुकीत महिलांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता शहराच्या प्रथम नागरिक पदासाठी हालचालींना वेग आला आहे. यंदा ७० पैकी ३६ जागांवर महिलांनी विजय मिळवत महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आरक्षणाप्रमाणे महापौरपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने, काँग्रेसच्या गोटातून तीन नावे प्रामुख्याने चर्चेत आली आहेत.

शर्यतीत असलेली 'ती' तीन नावे:
महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने महापौर पदी काँग्रेसचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने: १. मनीषा संभाजी बसपुरे (प्रभाग ३-अ) २. कांचन रत्नदीप अजनीकर (प्रभाग १०-अ) आणि ३. जयश्री भालचंद्र सोनकांबळे (प्रभाग १२-अ) 

राजकीय गणिते आणि वर्चस्व:
लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे संख्याबळ पाहता, या निवडीत दोन्ही पक्षांचा समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून वंचितच्या अंकिता भडीकर आणि निकिता सोमवंशी यांनीही विजय मिळवला आहे, तर भाजपच्या करुणा शिंदे यांनीही चुरस निर्माण केली आहे. मात्र, सत्तास्थापनेच्या गणितात काँग्रेसचा महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

'स्त्री-शक्ती'चा बोलबाला
आता काँग्रेसच्या मनीषा बसपुरे, कांचन अजनीकर आणि जयश्री सोनकांबळे या तीन नावांपैकी वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महापौर निवडीनंतर विषय समित्यांचे सभापती पदही महिलांच्याच वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने लातूरच्या राजकारणात 'स्त्री-शक्ती'चा बोलबाला राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur to Get Scheduled Caste Woman Mayor; Three in Congress Race

Web Summary : Latur's mayoral seat is reserved for a Scheduled Caste woman. Congress dominates after women won 36 of 70 seats. Manisha Baspure, Kanchan Ajnikar, and Jayashree Sonkamble are top contenders; Congress choice crucial.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेस