क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:30+5:302021-01-04T04:17:30+5:30

श्री गुरुगणेश ग्रंथालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सुमतीलालजी छाजेड, सहाय्यक ग्रंथपाल सुप्रिया कंदले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...

Krantijyoti Savitribai Phule's birthday celebrated with enthusiasm | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

श्री गुरुगणेश ग्रंथालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सुमतीलालजी छाजेड, सहाय्यक ग्रंथपाल सुप्रिया कंदले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजेश डुंगरवाल, सुनील गिरी, ऋषिकेश चापेकर आदींची उपस्थिती होती.

वैशाली बुद्ध विहारात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. केशव ऊर्फ बाळासाहेब कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मळवटी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक युवराज शिंदे, मधुकर गरड, उमाकांत धोंड, सुहास माकणीकर, जाफरअली सय्यद, श्रीकृष्ण पवार, विलास गिरी, मंजूषा शिंदे, चंद्रकांत चोपले, रंगनाथ माळी, गीता भोसले, सुनील आगलावे आदींची उपस्थिती होती.

संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. संस्थेचे मार्गदर्शक अण्णासाहेब कदम, मुख्याध्यापक व्ही.जी. गुणाले, एन.डी. वाघ, एस.पी. चव्हाण, ओ.बी. गोविंदपुरे, व्ही.बी. पवार, एस.आर. डाके, परिचारिका वाय.ए. जायभाये, लिपिक बी.डी. शिंदे, एस.एम. भोसले, जी.एस. गिरी, एस.आर. कांबळे, एन.जी. फुलसे आदींची उपस्थिती होती.

विशालनगर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्या सुमेरा शेख, माधुरी वाघमारे, मकरंद सबनीस, कमल मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लातूर वृक्ष टीमच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. लातूर वृक्ष टीमच्या सदस्य तथा महापालिकेचे उपायुक्त मंजूषा गुरमे यांच्या हस्ते मान्यवरांना गौरवपत्र देण्यात आले. ॲड. वैशाली यादव, डॉ. विमल डोळे, पूजा निचळे, सुलेखा कारेपूरकर, कल्पना कुलकर्णी, प्रिया नाईक, संजयादेवी गोरे, आशा अयाचित, युगा कनामे, राजलक्ष्मी लड्डा यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Krantijyoti Savitribai Phule's birthday celebrated with enthusiasm