शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जळकोटातील ६ हजार नागरिकांना कोविड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळकोट : जळकोट तालुका काेरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत तालुक्यात १९ हजार १७० जणांची कोविड चाचणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळकोट : जळकोट तालुका काेरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत तालुक्यात १९ हजार १७० जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. तसेच ६ हजार १२८ जणांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियोजन करुन तयारी करण्यात येत आहे. तसेच लसीकरणावर भर देण्यात आला आहे.

मध्यंतरीच्या कालावधीत जळकोट तालुक्यात कोविडबाधितांची संख्या वाढली होती. दरम्यान, आरोग्य, महसूल, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाने प्रभावीपणे जनजागृती करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. त्यामुळे तालुक्यातील कोविड बाधितांची संख्या घटली. आता तालुका कोरोनामुक्त आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्यावतीने लसीकरणावर भर देण्यात आला आहे. ज्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तालुक्यातील ४ हजार १८१ जणांनी पहिला डोस तर १ हजार ९४७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

जळकोट ग्रामीण रुग्णालयांतर्गत आतापर्यंत ६ हजार ३२५ जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ५ हजार ९९८, वांजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६ हजार ८४७ जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य विभागाने चाचण्या वाढविण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणावर भर दिल्याने जळकोट तालुका ३० जूनपासून कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे तालुकावासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यात आतापर्यंत १ हजार ८०१ जणांना कोविडचा संसर्ग झाला होता. त्यापैकी १ हजार ६४९ जण उपचारानंतर ठणठणीत झाले तर ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या निर्देशानुसार सातत्याने बैठका घेण्यात आल्या. आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, लता शेवाळे आदींनी सातत्याने बैठका घेऊन उपाययोजना राबविल्या.

आरोग्य विभागाकडून नियोजन...

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या आदेशावरुन जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. याठिकाणी तत्काळ उपचार मिळाल्यामुळे अनेकजण कोरोनामुक्त झाले. सध्या संपूर्ण तालुका कोरोनामुक्त आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियोजन करुन तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. सचिन सिद्धेश्वरे यांनी दिली.