शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

वाकी साठवण तलावात जल समाधी आंदोलन; अहमदपूरला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 16:33 IST

या कामाचे टेंडर निघून काम २ वर्षात पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही ५ वर्षे झाली तरी सुध्दा पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण झालेले नाही.

अहमदपुर : शहराला एक दिवसा आड पाणीपुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी अहमदपूर येथील वाकी साठवण तलावात साजीदभाई मित्रमंडळाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात २० ते २५ जणांनी पुलावरून वाकी साठवण तलावात उडी घेतली. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात येतील असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याने आंदोलक पाण्याबाहेर आले.

शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने ४४ कोटी ५२ लाख ८१ हजार ८०८ रुपये निधी मंजूर झाला. या कामाचे टेंडर निघून काम २ वर्षात पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही ५ वर्षे झाली तरी सुध्दा पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पाण्याविना शहरवासियांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून, २५ ते ३० दिवसांत एकदा शहरात पाणी पुरवठा होत आहे. नवीन पाणी पाईपलाईनसाठी शहरामध्ये केलेल्या खड्यावर काँक्रेट बेड टाकण्यात आले नाही. नविन कनेक्शन मोफत देण्याची तरतुद असतानाही दोन ते अडीच हजार रुपये प्रत्येकी कनेक्शनला घेतले जात आहे. जुन्या गावामध्ये पाईपलाईन टाकलेली नाही. नागरीकांची गैरसाेय होत असल्याने साजीदभाई मित्र मंडळाच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात साजीदभाई मित्रमंडळाचे अध्यक्ष साजीदभाई शेख, तालुकाध्यक्ष जाबेर पठान, शफीक बागवान, सलमान पठान, मोसीन शेख, बकशलाला शेख, महबूब शेख, घुडू साब मिस्त्री, मोबीन शेख, याकुब पठाण, हैदर बाबा, जमील खान, सुधीर लामतुरे, जिलाणी सय्यद, इम्रान पठाण, खादर लष्करी, एजाज सय्यद, पापा चाऊस, माजीद बागवान, गफ्फार मनियार, मुकद्दर शेख, सलीम सय्यद, अफसर शेख, इसाक तांबोळी, फारूख सय्यद, आजम शेख ,अस्लम शेख, अर्जुन गायकवाड, रज्जाक शेख रज्जब पठाण, नजीब सय्यद, हसन शेख, सोहेल चाऊस, किशोर वाघमारे, गौस बागवान, मोबीन सय्यद, मैनोद्दीन सय्यद, पठाण अजहर, अक्रम शेख सहभागी होते.

योजनेच्या कामाची चौकशी करावी...
अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या लिंबोटी धरणात पाण्याचा मुबलक पाणीसाठा असून सुध्दा शहराला २५ ते ३० दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याने चौकशी झाली पाहिजे. १७ कोटीचा झालेला भ्रष्ट्राचार जनतेसमोर यावा, अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा साजीदभाई मित्र मंडळाचे अध्यक्ष साजीदभाई सय्यद यांनी दिला.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी