शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

गत तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी लातूर, रेणापूर, देवणी ...

गत तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी लातूर, रेणापूर, देवणी तालुक्यांसह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांतील काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील सर्व महसूल मंडळांत गत पंधरा दिवसांत दोनवेळा मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती मिळताच पाहणी करून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा प्रशासनाला पाहणीचे आदेश मिळताच लातूर तालुक्यातील गंगापूर आणि रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, दर्जीबोरगाव, गव्हाण, ब्रम्हवाडी, आंदलगाव येथील नुकसान झालेल्या उसासह खरीप पिकांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

यावेळी लातूर जिल्हा नियोजन समितीचे विजय देशमुख, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, रवींद्र काळे, लातूरचे उपविभागीय अधिकारी सुनील यादव, रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, लातूरचे तहसीलदार स्वप्निल पवार, रेणापूरचे तहसीलदार राहुल पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, प्रा. अरुण गुट्टे, प्रभारी कृषी अधिकारी योगिता आरदवाड, रेणापूर तालुका कृषी अधिकारी नागरगोजे, मंडळ अधिकारी हिप्परगे, माजी उपसभापती बाळकृष्ण माने, रमेश थोरमोटे, डॉ. सतीश कानडे, तानाजी फुटाणे, सरपंच बाबू खंदाडे, किरण शिंदे, जानुमिया शेख, बलभीम शिंदे, सुधाकर शिंदे, विठ्ठल गाडेकर, बिभीषण कदम, शरद माने, रामराव माने, भारत पवार, आकाश जाधव, ज्योतिराम चव्हाण, व्यंकट पवार, विनायकराव माने, विलास रोगे, बकंट माने, शिवाजी माने, सुरेश माने, भरतराव मोरे, भास्कर मोरे, संजय मोरे, विशाल मोरे, शहाजी मोरे यांची उपस्थिती हाेती.