शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जंतामुळे खुंटते बालकांची बौद्धिक, शारीरिक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST

जंतांमुळे ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, कुपोषण, थकवा व अस्वस्थता, आतड्यास सूज येणे असा बालकांवर परिणाम होतो. ...

जंतांमुळे ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, कुपोषण, थकवा व अस्वस्थता, आतड्यास सूज येणे असा बालकांवर परिणाम होतो. १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींमध्ये या आजारांचे प्रमाण अधिक असते. असे आजार उद्भवू नयेत म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत १ मार्चपासून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे म्हणाले, जंतनाशक ही मोहीम वर्षातून दोनदा राबविण्यात येते. जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांत १ मार्च रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व शासकीय, अनुदानित, आश्रमशाळा, महापालिका शाळा, खासगी शाळेतील इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुला-मुलींना आशा स्वयंसेविकांमार्फत गोळी देण्यात येणार आहे.

चांगल्या आरोग्यासाठी गोळी गरजेची...

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम आहे. १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींचे आरोग्य चांगले राहावे, पोषण चांगले व्हावे, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुला- मुलींना जंतनाशक गोळी द्यावी.

- अभिनव गोयल, सीईओ, जिल्हा परिषद

पावणेपाच लाख मुला-मुलींना दिली जाणार गोळी...

जिल्ह्यात सरकारी व खासगी अशा एकूण २०११ शाळा आहेत. तेथील ३ लाख २७ हजार ५१९ तसेच अंगणवाडीतील १ लाख ४९ हजार ३८२ मुला-मुलींना जंतनाशक गोळी सोमवारी दिली जाणार आहे. शाळाबाह्य २ हजार ९३६ मुला-मुलींना आशा स्वयंसेविकांमार्फत ही गोळी खाऊ घातली जाणार आहे. एकूण ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, अंगणवाडीत न आलेल्या बालकांना आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन ही गोळी देणार आहेत.

- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी