शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे उदगिरातील १४ प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

उदगीर : गत महिन्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील एकूण १४ मध्यम, साठवण व लघु प्रकल्पातील ...

उदगीर : गत महिन्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील एकूण १४ मध्यम, साठवण व लघु प्रकल्पातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बहुतांश लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. देवर्जन व तिरू मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ६९ टक्के व ७५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे यंदा खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. पिकेही बहरली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात जवळपास २५ दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे चिंता वाढली होती. दरम्यान, मागील महिन्यापासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील १४ प्रकल्पांत चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

तालुक्यातील देवर्जन व तिरू दोन मध्यम प्रकल्प, करखेली, बामाचीवाडी, गुडसूर व डाऊळ हिप्परगा हे चार साठवण तलाव तर केसगीरवाडी, पिंपरी, नागलगाव, गुरदाळ, कल्लूर, एकुर्का रोड, निडेबन, कोदळी व चांदेगाव हे लघु प्रकल्प आहेत. देवर्जनमध्ये ६९ टक्के तर तिरू मध्यम प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गुडसूर, डाऊळ हिप्परगा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. करखेली १२.१८ टक्के तर बामाचीवाडी साठवण प्रकल्पात १०.७९ टक्के पाणी उपलब्ध आहे. केसगीरवाडी, पिंपरी, नागलगाव, गुरदाळ, कल्लूर, एकुर्का रोड, निडेबन, कोदळी, चांदेगाव आदी ९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या रबी हंगामासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. आणखीन पावसाळा शिल्लक असल्याने मोठ्या पावसाची अपेक्षा असून एक- दोन पावसांतच तालुक्यातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतील, अशी अपेक्षा आहे.

बनशेळकी तलाव भरला...

उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारा बनशेळकी तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शहराला भविष्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. सुरळीत पाणीपुरवठा करता येईल, अशी माहिती नगराध्यक्ष बसवराज बागबंदे व पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले यांनी दिली.

पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही...

यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही. तसेच शेतकऱ्यांना रबी हंगामात पिकांसाठीही फायदा होईल, असे वाढवणा लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता नईम मोमीन यांनी सांगितले.