शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीचा वापर सुरू आहे. ग्रामीण भागात ...

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीचा वापर सुरू आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पहिला डोस ७ लाख ५० हजार ९४६ जणांनी घेतला आहे तर दोन्ही डोस २ लाख ७१ हजार ८४० लोकांनी घेतला आहे. ५ लाख ४९ हजार ५४४ पुरुषांनी तर ४ लाख ७३ हजार ९१ महिलांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे. त्यातील अनेकांना ताप किंवा अंग, डोकेदुखीचा त्रास झालेला नाही तर काहींना अंग, ताप, डोकेदुखीचा त्रास झालेला आहे. त्रास झाल्यानंतरच परिणाकारकता असते असा अनेकांचा समज आहे परंतु आरोग्य विभागाने याला दुजोरा दिलेला नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्यामुळे कोणाला लसीचा त्रास होऊ शकतो तर कोणाला होऊ शकत नाही. ताप आला तरच लसीची परिणामकारकता अधिक आहे, असे म्हणणे गैरसमजच असून अज्ञानातून ही चर्चा होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. त्यामुळे अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले हा तर गैरसमज....

जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतरच लस वितरीत केले जाते. लसीची परिणामकारकता तपासूनच वितरित करण्याचे मापदंड आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यामुळे ताप, अंग व डोकेदुखीचा कोणाला त्रास होतो तर कोणाला होत नाही. त्यामुळे लसीची परिणामकारकता नाही असे म्हणणे हा गैरसमज आहे आणि तो चुकीचा आहे. जिल्ह्यात वापरण्यात येत असलेल्या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. त्यामुळे कोणी असे गैरसमज करून घेऊ नयेत.

डॉ एल.एस. देशमुख जिल्हा शल्यचिकित्सक

पहिला डोस :७५०९४६

दुसरा डोस : २७१८४०

एकूण डोस : १०२२७८६

कोविशिल्डचा वापर : ८२०५१८

कोव्हॅक्सिनचा वापर : २०२२६८

पुरुष लसीकरण : ५४९५४४

महिला लसीकरण : ४७३०९१