लातूर शहरात घर फोडले; दाेन लाखांचा ऐवज लंपास, चाेरट्यांविराेधात गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: April 18, 2026 06:05 IST2026-04-18T06:05:08+5:302026-04-18T06:05:32+5:30

Latur Crime News: लातूर - शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मीकी नगर भागात एक बंदघर चाेरट्यांनी फाेडल्याची घटना घडली असून, रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा १ लाख ७३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे.

House broken into in Latur city; Property worth Rs 2 lakhs looted, crime against thieves | लातूर शहरात घर फोडले; दाेन लाखांचा ऐवज लंपास, चाेरट्यांविराेधात गुन्हा

लातूर शहरात घर फोडले; दाेन लाखांचा ऐवज लंपास, चाेरट्यांविराेधात गुन्हा

- राजकुमार जाेंधळे
लातूर - शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मीकी नगर भागात एक बंदघर चाेरट्यांनी फाेडल्याची घटना घडली असून, रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा १ लाख ७३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे. ही घटना १७ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नंदकिशोर द्वारकादास झंवर (वय ४९, रा. तुळशी कुंज, वाल्मीकी नगर, लातूर) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. शुक्रवार, १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लॉकरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ४० हजार रुपये रोख आणि एकूण ३३.०५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन (किंमत १ लाख ३३ हजार ५५० रुपये) असा एकूण १ लाख ७३ हजार ५५० रुपयांचा ऐवज लंपास केला.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नंदकिशोर झंवर यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या जबाबावरून अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, चाेरट्यांचा शाेध सुरु आहे. तपास पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. खंदारे हे करीत आहेत.

घरफाेडीच्या घटनामध्ये वाढ; नागरिकांत चिंतेचे वातावरण...
लातूरसह जिल्ह्यात घरफोडीच्या घटनात वाढ हाेत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लवकरच चोरट्यांना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title : लातूर में घर में चोरी; दो लाख का माल गायब, मामला दर्ज

Web Summary : लातूर के एमआईडीसी क्षेत्र में चोरों ने एक घर में सेंध लगाई, ₹1.73 लाख नकद और सोने के गहने चुराए। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है, बढ़ती चोरियों से चिंता बढ़ रही है।

Web Title : Latur House Burgled; Two Lakhs Worth Looted, Case Filed

Web Summary : Burglars broke into a house in Latur's MIDC area, stealing ₹1.73 lakh worth of cash and gold jewelry. Police have registered a case and are investigating, amidst rising concerns over increasing burglaries.