शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात आता गृहविलगीकरण बंद; संस्थात्मक विलगीकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 16:14 IST

सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने अडीच ते तीन हजारांच्या आसपास चाचण्या होत आहेत. त्यात वाढ करून तीन ते साडेतीन हजार चाचण्या करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक मुद्देलातूर जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. शंभर-दीडशेच्या आत दररोज रुग्ण आढळत आहेत.

लातूर : कोरोनाबाधित रुग्ण संसर्गाचे वाहक ठरू नयेत म्हणून आता सौम्य लक्षणाच्या रुग्णांसाठी असलेली गृहविलगीकरणाची सोय रद्द करण्यात येणार असून, त्यांना संस्थात्मक विलगीकरणात उपचार करण्याचे संकेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.

लातूर जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. शंभर-दीडशेच्या आत दररोज रुग्ण आढळत आहेत. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेटही ८ टक्क्यांच्या खाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. अशावेळी संसर्ग वाढू नये म्हणून बाधित रुग्णांना गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गृहविलगीकरणातील रुग्ण जबाबदारीने वागत नाहीत. ते घरात व बाहेर बिनधास्त फिरतात. त्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांना आता संस्थात्मक विलगीकरणात दाखल केले जाणार आहे. संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये सर्व सुविधा, जागा उपलब्ध आहेत. संस्थात्मक विलगीकरणात राहिल्यास संसर्ग होणार नाही. प्रसारावर मर्यादा येते. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी गृहविलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन हजारांच्या पुढे चाचण्यासध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने अडीच ते तीन हजारांच्या आसपास चाचण्या होत आहेत. त्यात वाढ करून तीन ते साडेतीन हजार चाचण्या करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्याही चाचण्या करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ती केव्हा येणार निश्चित नसले, तरी लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष असून, लहान मुलांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था तसेच ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlaturलातूर