आरोग्य यंत्रणांना निधी कमी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:01+5:302021-01-03T04:21:01+5:30

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विकास योजनांचा विभागनिहाय आढावा पालकमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी घेतला. योजना व त्याची सद्य:स्थिती, त्यातील ...

Health systems will not run out of funds | आरोग्य यंत्रणांना निधी कमी पडणार नाही

आरोग्य यंत्रणांना निधी कमी पडणार नाही

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विकास योजनांचा विभागनिहाय आढावा पालकमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी घेतला. योजना व त्याची सद्य:स्थिती, त्यातील अडचणी, उपलब्ध निधी व आवश्यक निधीच्या संदर्भाने चर्चा करण्यात आली. जलसंपदा विभागाचे सर्व तलाव, बंधारे, बॅरेजेस यातील पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, कामाची गुणवत्ता राखावी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे, वृक्ष संगोपनावर लक्ष द्यावे, जिल्हा तसेच तालुका, गावपातळीवर क्रीडा संकुलाचा विकास करावा, शालेय स्तरावर दर्जेदार क्रीडा साहित्य पुरवावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दुशिंग, सहाय्यक नियोजन अधिकारी रेड्डी, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. लक्ष्मण देशमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. मोहन डोईबळे, सामाजिक वनीकरणाचे अधिकारी गंगावणे, वनीकरण विभागाचे रामपुरे, कार्यकारी अभियंता शेलार, जलसंधारणचे उपअभियंता अनिल कांबळे, क्रीडाधिकारी महादेव कसगावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एम. थोरात, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता नितनवरे यांनी आपापल्या विभागाची माहिती सादर केली.

Web Title: Health systems will not run out of funds