कुमठ्याच्या शिबिरात ५८६ जणांची मोफत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:15+5:302020-12-11T04:46:15+5:30

शिरूर ताजबंद : अहमदपूर तालुक्यातील कुमठा (बु.) येथे आयोजित शिबिरात ५८६ जणांची मोफत तपासणी करण्यात येऊन औषधोपचार देण्यात आले, ...

Free check-up of 586 people in Kumtha camp | कुमठ्याच्या शिबिरात ५८६ जणांची मोफत तपासणी

कुमठ्याच्या शिबिरात ५८६ जणांची मोफत तपासणी

शिरूर ताजबंद : अहमदपूर तालुक्यातील कुमठा (बु.) येथे आयोजित शिबिरात ५८६ जणांची मोफत तपासणी करण्यात येऊन औषधोपचार देण्यात आले, तसेच ७६ जणांनी रक्तदान केले.

भगवानसिंह बयास गुरुजींच्या जयंतीनिमित्त गावकरी, आरोग्य विभाग, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय आणि लॉयन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. उद्घाटन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता निवृत्ती चिंते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चंद्रशेखर पाटील, डॉ. क्रांतीसिंह शिलेदार, सरपंच शोभाताई जाधव, चेअरमन रावसाहेब भोसले, बी.एस. भिंगोले, बालाजी गुळवे, अंकुशराव कानवटे, डॉ. दिलीप ठाकूर, प्राचार्य लिंबराज केसाळे, चतुरसिंह बयास, पांडुरंग तिगोटे आदी उपस्थित होते. यावेळी एकूण ५८६ जणांची तपासणी करण्यात आली, तसेच ५१ जणांची नेत्र तपासणी करण्यात येऊन त्यातील १४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शिबिरात डॉ. लक्ष्मण ढोकाडे, डॉ. उषा काळे, डॉ. सुनील दासरे, डॉ. ओमप्रकाश कदम, डॉ. राहुल सारोळे, डॉ. दत्ता पाटील, डॉ. बस्वराज शेटकार, डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. स्वप्नील शिंदे आदी डॉक्टर सहभागी झाले होते. प्रास्ताविक अक्षय गुळवे यांनी केले. आभार प्रा. राहुल तिगोटे यांनी मानले.

यशस्वीतेसाठी महेश बयास, पूजा बयास, गणेश बयास, डी.आर. तिगोटे, उद्धव ढोकाडे, अब्दुल गफूर देशमुख, शैलैद्रसिंह बयास, गजेंद्रसिंह बयास, बी.आर. भोसले, श्याम ढेले, महेश टिकोरे, महेश मरवाळे, सत्यनारायणसिंह बयास आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Free check-up of 586 people in Kumtha camp