भाजीपाल्याच्या वाहनासह पाच लाखांची दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:02+5:302021-09-19T04:21:02+5:30

पाेलिसांनी सांगितले, औसा ते तुळजापूर महामार्गावरील काजळे चिंचाेली पाटी येथे सापळा लावला. दरम्यान, एम.एच. २५ ए.जे. ०८४४ या वाहनातून ...

Five lakh liquor seized along with a vegetable vehicle | भाजीपाल्याच्या वाहनासह पाच लाखांची दारु जप्त

भाजीपाल्याच्या वाहनासह पाच लाखांची दारु जप्त

पाेलिसांनी सांगितले, औसा ते तुळजापूर महामार्गावरील काजळे चिंचाेली पाटी येथे सापळा लावला. दरम्यान, एम.एच. २५ ए.जे. ०८४४ या वाहनातून भाजीपाला कॅरेटसाेबत विदेशी दारुची माेठ्या प्रमाणावर वाहतूक हाेत असल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पाेलीस निरीक्षक विलास नवले यांच्या पथकाने येणाऱ्या वाहनाला ताब्यात घेतले. दरम्यान, वाहनाची झाडाझडती घेतली असता, त्यामध्ये विदेशी दारुचा माेठा साठा हाती लागला. यावेळी वाहनासह विदेशी दारु असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत भादा पाेलीस ठाण्यात दयानंद अरुण शिंदे रा. नारी, ता. बार्शी जि. साेलापूर यांच्याविराेधा रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपाेनि. विलास नवले, पाेलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पाेलीस कर्मचारी गिरी, डाेलारे, फड, क्षीरसागर, चव्हाण, दिंडे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Five lakh liquor seized along with a vegetable vehicle