शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीतून सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:20 IST

उजनी : लातूर-उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या उजनी येथे ४ कोटी खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत बांधण्यात ...

उजनी : लातूर-उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या उजनी येथे ४ कोटी खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, तिचे हस्तांतरण न झाल्याने अद्यापही वापर सुरू झाला नव्हता. या संदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच, त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन सदरील इमारतीतून आरोग्यसेवा देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

औसा तालुक्यातील उजनी हे बाजारपेठेचे गाव आहे. औसा-तुळजापूर रस्त्यावर असलेल्या या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रांतर्गत ५ उपकेंद्र आहेत, तसेच आशिव, वांगजी, आशीव तांडा, चिंचोली, मासुर्डी, बिरबली, टाका, गुळखेडा, रिंगणीवाडी, एकंबी तांडा, कमालपूर, काकसपूर, धुत्ता, भंडारी येथील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत छोटीशी असल्याने बाळंतपणासाठी आलेल्या मातेची अडचण होत असे, तसेच इमारतीची पडझड झाली आहे. ही समस्या पाहून शासनाने ४ कोटी रुपये खर्चून नवीन इमारत उभी केली.

ही नवी इमारत उभी करुन काही महिने उलटले. मात्र, अद्यापही हस्तांतरण अथवा आरोग्य केंद्राचे स्थलांतर झाले नव्हते. त्यामुळे कोविड लसीकरणासाठी आलेल्यांना बसण्यासाठी मंडप टाकण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत होती. या संदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच, त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. तातडीने नवीन इमारतीतून आरोग्य सेवा देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, शुक्रवारपासून नवीन इमारतीतून सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. नव्या इमारतीतून एकंबीचे सरपंच काकासाहेब पाटील यांना कोविडची लस देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एस. देवणीकर, औसा खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शेखर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कोपरकर, अ‍ॅड.सचिन सलगरे व कर्मचारी उपस्थित होते.

लवकरच सर्व सेवा...

नवीन इमारतीतून सध्या लसीकरण करण्यात येत आहे, तसेच जुन्या इमारतीतील आवश्यक साहित्य नवीन इमारतीत आणण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर, नव्या इमारतीतून रुग्णांना आरोग्यसेवा मिळतील, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एस. देवणीकर यांनी सांगितले.