स्पर्श बाल रुग्णालयाचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:58+5:302021-06-18T04:14:58+5:30

रुग्णालयाचे संचालक डाॅ. नारायण नागमोडे, डाॅ. आयाज शेख, डाॅ. संतोष बजाज यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा झाला. स्पर्श बाल ...

Excitement over the anniversary of Sparsh Children's Hospital | स्पर्श बाल रुग्णालयाचा वर्धापन दिन उत्साहात

स्पर्श बाल रुग्णालयाचा वर्धापन दिन उत्साहात

googlenewsNext

रुग्णालयाचे संचालक डाॅ. नारायण नागमोडे, डाॅ. आयाज शेख, डाॅ. संतोष बजाज यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा झाला. स्पर्श बाल रुग्णालय व अतिदक्षता केंद्र ५० खाटांचे असून, या बाल रुग्णालयात अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. नवजात अतिदक्षता, बालक अतिदक्षता केंद्र अशा अद्ययावत उपकरणांनी रुग्णालयातून सेवा दिली जाते. कमी वजनाच्या व कमी दिवसात जन्मलेल्या बाळांवर नवनवीन व अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. गेल्या दहा वर्षांत ६ हजार बाळांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ६५० ग्रॅम वजनाच्या बाळावर यशस्वी उपचार करून जीवदान देण्यात डाॅक्टरांना यश आले आहे.

रुग्णालयात कृत्रिम श्वासोच्छ्‌श्वासच्या मशीन, बायपॅप मशीन, कावीळ कमी करण्याची मशीन, माॅनिटर्स, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जनरल वाॅर्ड, स्पेशल रूम आदी सुविधा आहेत. सदर तीन तज्ज्ञ डाॅक्टर्स २४ तास सेवा देत आहेत.

(वा.प्र.)

Web Title: Excitement over the anniversary of Sparsh Children's Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.