शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
5
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
6
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
7
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
8
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
9
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
10
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
11
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
12
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
13
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
14
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
15
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
16
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
17
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
18
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
19
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
20
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या आदेशानुसार निवडणुका होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

सध्या महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची भूमिका ठरविण्याचा अधिकार आहे. जो काही ...

सध्या महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची भूमिका ठरविण्याचा अधिकार आहे. जो काही पक्ष आदेश असेल तो सर्वांसाठी कायम असतो. त्याची अंमलबजावणी आपण सर्वांनी केली पाहिजे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्यात आल्यानंतर शासनाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात येईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांना पिकांचे, रस्त्यांच्या पुलांचे जे काही नुकसान झाले आहे, त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिकविमा माहीती भरण्यासंदर्भात ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात येतील, असे सांगून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध...

जळकोट नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या. जळकोट शहराचा कायापालट करून देऊ. जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचेही राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, ज्येष्ठ नेते मन्मथ आप्पा किडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे संचालक गजानन पाटील दळवी, संग्राम पाटील हसुळे, महेश धूळशेटे, पाशा शेख, दिलीप कांबळे, दस्तगीर शेख, धनंजय धर्मांना, गोविंद ब्रह्मंना, शहराध्यक्ष अशोक डांगे, बालाजी आगलावे, मनोहर वाकळे, संग्राम नामवाड, नितीन धूळशेटे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन आदी उपस्थित होते.