शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

८ गावांचे ई-पीक पाहणीचे काम शंभर टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

तालुक्यातील कुमदाळ, बामाजीचीवाडी, खेर्डा, मुत्तलगाव, धडकनाळ, अनुपवाडी, तादलापूर, तिवटग्याळ या आठ गावांतील शेतकऱ्यांनी ई-पीक प्रणालीचा वापर करून संपूर्ण ...

तालुक्यातील कुमदाळ, बामाजीचीवाडी, खेर्डा, मुत्तलगाव, धडकनाळ, अनुपवाडी, तादलापूर, तिवटग्याळ या आठ गावांतील शेतकऱ्यांनी ई-पीक प्रणालीचा वापर करून संपूर्ण माहिती अपलोड केली आहे. एकूण ६२ हजार ५२५ शेतकऱ्यांपैकी २८ हजार १४७ शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करून आपल्या शेतातील पीक, झाड, विहिरी, बोअर आदींची नोंद केली आहे. अद्याप तालुक्यातील ३४ हजार ३७८ शेतकऱ्यांनी या ॲपद्वारे नोंदणी केली नाही. त्या अनुषंगाने तालुक्यातील मंडळ अधिकारी ई-पीक पाहणी करून घेत आहेत. प्रत्येक दोन मंडळांस एक नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वतः उपविभागीय अधिकारी व तहसीलदार गावात जाऊन प्रणालीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पाठपुरावा करीत आहेत.

उदगीर तालुक्यातील मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषी साहाय्यकांची बैठक घेऊन त्यानुसार पुढील सात दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मंडळात हजर राहून पीक पाहणीचे काम पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद प्रणालीद्वारे अपलोड करण्याचे आवाहन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले आहे.

याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांना उदगीरचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यात उर्वरित सात दिवसांत काम करण्यात येत असल्याचे तहसीलदार गोरे यांनी सांगितले.