शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

दाता आला द्यायला अन् पदर नाही घ्यायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे रुग्ण सोलापूरला रवाना... अवयवदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी समिती तातडीने गठीत करून शासनाची संमती मिळविता येते का यावर ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे रुग्ण सोलापूरला रवाना...

अवयवदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी समिती तातडीने गठीत करून शासनाची संमती मिळविता येते का यावर बरीच धावपळ करण्यात आली, परंतु निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णाला तत्काळ सोलापूरला हलविण्यासाठी सहकार्य केले. प्रत्येक अर्धा तासाला जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन अवयवदानाचा लाभ इतर रुग्णांना मिळण्यासाठी तत्परता दाखविली. सध्या स्थितीत पवार कुटुंबीय सोलापूरला असून गुरुवारपर्यंत सर्व प्रक्रिया पार पडेल.

नूतनीकरण थांबले, जबाबदार कोण...

अवयवदान प्रक्रिया थांबण्याची ही दुसरी वेळ आहे. साधारणपणे दीड वर्षापूर्वी १७ वर्षीय युवतीच्या कुटुंबीयांनी अशीच इच्छा प्रदर्शित केली, परंतु त्याहीवेळी नूतनीकरण व तत्सम तांत्रिक अडचणीमुळे अवयवदान प्रक्रिया होऊ शकली नाही. परत दुसऱ्यांदा तेच घडले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने जबाबदारी वेळेत पार का पाडली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख हे कार्यालयीन कामकाजासाठी बाहेरगावी आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी नूतनीकरण करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचेही पालन झाले नसल्याने आता घडल्या प्रकाराची चौकशी होणार याकडे लक्ष लागले आहे.

पवार कुटुंबीयांचे कौतुक...

शरद दादासाहेब पवार हे शेतकरी आहेत. त्यांचे बंधू प्रा. सतीश पवार, आशिष पवार यांनी कुटुंबीयांतील सदस्यांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या पत्नी सुलभा पवार, मुलगी साक्षी, श्रुती यांच्यासह सर्वांनीच अवयवदानाला तत्काळ संमती दर्शविली. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या आई सिंधू पवार यांनीही देहदानाचा संकल्प केला आहे. गरजूंना जीवदान मिळण्यासाठी पवार कुटुंबीयांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.