चायनीज खाताय की पाेटाच्या आजारांनाच निमंत्रण देताय..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:46+5:302021-09-22T04:23:46+5:30

पाेटदुखीचा आजार बळावला... चायनीज पदार्थामध्ये अजिनाेमाेटाे अर्थात माेनाे साेडियम ग्लुटामिटचा वापर केला जाताे. परिणामी, पाेटाचे विकार वाढत आहेत. यासाठी ...

Do you eat Chinese food or do you invite stomach ailments? | चायनीज खाताय की पाेटाच्या आजारांनाच निमंत्रण देताय..?

चायनीज खाताय की पाेटाच्या आजारांनाच निमंत्रण देताय..?

पाेटदुखीचा आजार बळावला...

चायनीज पदार्थामध्ये अजिनाेमाेटाे अर्थात माेनाे साेडियम ग्लुटामिटचा वापर केला जाताे. परिणामी, पाेटाचे विकार वाढत आहेत. यासाठी पाेटदुखीचा प्रकार उद्धभवला तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. शक्यताे पाेटदुखी वारंवार हाेत असेल तर ते खाणे टाळणे याेग्य राहणार आहे. चायनीज पदार्थ पचनाला अवघड असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

म्हणून चायनीज खाण्याचे टाळावे...

चायनीज पदार्थामध्ये माेनाे साेडियम ग्लुटामिटचा वापर, तेल आणि मसाल्यांचे पदार्थही माेठ्या प्रमाणावर वापरले जातात. यातून छाेट्या मुलांना पचनाला खूप कठीण जाते. आपल्याला भारतीय पद्धतीने केलेले खाद्यपदार्थ खाण्याची सवय आहे. चायनिज पदर्थ खाताना टेस्टी आणि चटपटीत वाटतात. मात्र, त्याचे पचनावर परिणाम हाेत असल्याने पाेटाचे विकार वाढत आहेत.

डाॅक्टरांचा सल्ला घ्या...

चायनीज पदार्थ खाल्याने आपले पाेट बिघडले. जुलाब लागला, गुडगुड हाेत असेल तर तातडीने आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत. बऱ्याचदा अनेकांना अशा पदार्थांची सवय नसते. दरराेज आपण साधा आधार घेताे. मात्र, वेगवेगळ्या मसाल्यामध्ये, तेलामध्ये तळलेल्या चायनीज पदार्थांचे खाणे अनेकांना अंगलट येणारेच असते. यासाठी पाेटदुखीचा आजार झाला तर डाॅक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.

Web Title: Do you eat Chinese food or do you invite stomach ailments?