शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बसस्थानकातील हिरकणी कक्ष कुलूपबंद; मातांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST

लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये हिरकणी कक्ष आहे. या कक्षाला गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूप आहे. हा कक्ष कधीच उघडला जात ...

लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये हिरकणी कक्ष आहे. या कक्षाला गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूप आहे. हा कक्ष कधीच उघडला जात नाही. मातांकडून मागणी होत नसल्याचे कारण दाखवीत हा कक्ष बंदच ठेवण्यात आला आहे. बसस्थानकात आल्यानंतर आपल्या बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी या कक्षात एक टेबल, एक खुर्ची उपलब्ध करून देण्याची ही योजना होती. मात्र, काही दिवसांतच लातूरच्या बसस्थानकात या योजनेला घरघर लागली असून, कक्ष भांडार झाला आहे.

योजनेच्या सुरुवातीच्या काळात बसस्थानकात ध्वनिक्षेपकावरून या कक्षाबाबत माहितीही दिली जात होती. या योजनेचा फायदा अनेक मातांना झाला; परंतु अचानक कक्ष कुलूपबंद झाल्याने बसस्थानकात बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या मातांची बाळाला स्तनपान देण्यासाठी गैरसोय होत आहे. कक्ष पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणीही महिला वर्गातून होत आहे.

८ महिन्यांपासून हिरकणी कक्ष बंद

लातूर मध्यवर्ती बसस्थानकातील हिरकणी कक्ष गेल्या आठ महिन्यांपासून बंदच आहे, तर अन्य एका बसस्थानकात हिरकणी कक्षच नाही. मध्यवर्ती बसस्थानकात हिरकणी कक्ष असला तरी तो कायमस्वरूपी कुलूपबंद आहे. तो सुरू करण्यात यावा, अशी मागणी अनेक महिलांनी केली.

हिरकणी कक्ष सुरू

मध्यवर्ती बसस्थानकातील हिरकणी कक्षाला लाॅक लावण्यात आले आहे. माता आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी तेथे आल्यानंतर उघडून दिले जाते. यासाठी महिला कर्मचारी तेथे नियुक्त आहे. हिरकणी कक्षाची सेवा सुरूच आहे. बंद केलेली नाही.

-जाफर कुरेशी,

आगार प्रमुख, लातूर