देवणी पंचायत समिती सभापतींचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST2021-02-05T06:22:24+5:302021-02-05T06:22:24+5:30

देवणी पंचायत समितीत भाजपाची एकहाती सत्ता आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील सत्यवान कांबळे हे सभापती तर उपसभापती ...

Devani Panchayat Samiti chairperson resigns | देवणी पंचायत समिती सभापतींचा राजीनामा

देवणी पंचायत समिती सभापतींचा राजीनामा

देवणी पंचायत समितीत भाजपाची एकहाती सत्ता आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील सत्यवान कांबळे हे सभापती तर उपसभापती शंकरराव पाटील यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतरच्या आरक्षण सोडतीनंतर सभापतिपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले. या पदाच्या दोन महिला हक्कदार असल्याने दोघीनांही न्याय देण्यासाठी विद्यमान सभापती चित्रकला बिरादार यांचा राजीनामा असल्याचे सांगितले जात आहे. सभापती चित्रकला बिरादार यांनी पक्षाच्या ठरलेल्या धोरणाप्रमाणे राजीनामा सादर केल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील मोठ्या गणल्या जाणाऱ्या गावात गटातटाचे आणि शह-कटशहाचे राजकारण झाल्याने काही गावांत भाजपाला ग्रामपंचायतीपासून दूर राहावे लागले. त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा होत आहे.

Web Title: Devani Panchayat Samiti chairperson resigns