शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे नुकसान; चौघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST

लातूर शहरातून लाखाचे ड्रायफ्रुटस्‌ चोरीला लातूर : शहरातील डालडा फॅक्टरी परिसरात ...

लातूर शहरातून लाखाचे ड्रायफ्रुटस्‌ चोरीला

लातूर : शहरातील डालडा फॅक्टरी परिसरात पीकअप वाहन (एमएच-२४, एव्ही-४२९) उभे करून चहा पिण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी वाहनातील ड्रायफ्रुटस्‌ (किंमत १ लाख ६ हजार) लंपास केल्याची घटना घडली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात संजय साधू गुजारे (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश

लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेपासून ते १५ जानेवारी २०२१ रोजी दिवसभर शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

विद्युत मोटारींची चोरी

लातूर : शेतात विहिरीवर असलेल्या दोन मोटारी व इतर साहित्य अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना लामजना शिवारात २९ ते ३० डिसेंबरच्या रात्री घडली. याबाबत किल्लारी पोलीस ठाण्यात अजमोद्दीन खय्युम शेख (४९, रा. लामजना, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार उस्तुर्गे करीत आहेत.

बाजारात मोबाईल चोरी

लातूर : औसा तालुक्यातील किल्लारी येथे भरलेल्या आठवडी बाजारात फिर्यादीसह इतर सहा जणांचे मोबाइल अज्ञातांनी पळविल्याची घटना २ जानेवारी रोजी घडली. याबाबत किल्लारी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर चंद्रकांत परसगावे (३८, रा. किल्लारी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मोबाइल चोरीचे प्रमाण अलीकडे वाढले आहेत.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

लातूर : शहरातील बौद्धनगर येथे असलेल्या वैशाली बुद्धविहारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास भन्ते रत्नपाल (वर्धा), कुमार सोनकांबळे, अशोकराव सातपुते, सूर्यभान लातूरकर, विजय मस्के, अरविंद दमावले, मीना सुरवसे, लताबाई चिकटे, जगन्नाथ सुरवसे, केशव कांबळे यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती. प्रारंभी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.