शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी; आणखी ६ पॉझिटिव्ह रूग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:15 PM

लातूर शहरातील २, रेणापूर २, औसा तालुक्यात २ नवे रुग्ण

लातूर : लातूर येथील शासकीय रुग्णालयात गेल्या ११ दिवसांपासून उपचार घेत असलेल्या एका ५५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात आणखी ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यात लातूर शहरातील संभाजी नगरातील २, रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील २ आणि औसा शहरातील कादरीनगर व हिप्परगा येथील प्रत्येकी १ अशा एकूण ६ रुग्णांचा समावेश आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील एक ५५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होता. सदर रुग्णास हृदयविकार तसेच रक्तदाबाचा त्रास होता. तसेच कोरोनामुळे न्यूमोनियाही झाला होता. दरम्यान, बुधवारी उपचारादरम्यान सदर रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा चौथा कोरोनाचा बळी आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी एकूण ६६ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ६ पॉझिटिव्ह आले आहेत.  सहापैकी ५ रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास असून, औशाचा एक रुग्ण सोलापूर येथून आला आहे. आता जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख १४२ वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर