शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लातुरात मोफत भाजीपाल्यासाठी नागरिक रस्त्यांवर ! पोलिसांनी पांगवला जमाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 18:19 IST

गरजूंना मोफत भाजीपाला वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ

ठळक मुद्देलातुरातील साळे गल्ली येथील प्रकार मदत करायची असल्यास घरी जाऊन मदत करा

लातूर :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आल्याने अनेकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी इतरांकडे पाहण्याची वेळ आली आहे़ गरजूंना विविध सामाजिक संस्था, संघटना मदत पोहचिवण्याचे काम आहेत़ शहरातील साळे गल्ली भागात गरजूंना भाजीपाला वाटपाचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरू असताना शेकडो लोकांची गर्दी उसळली़ अखेर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घ्यावी लागली़ गर्दी पांगताच  पोलिसांनी आयोजकालाही चांगलीच समज दिली़

 प्रशासनाने अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणीही पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे़ गर्दी कमी करण्यासाठी पोलीस, महापालिका प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहेत़ हे सर्व सुरळीत सुरू असताना लातूर शहरातील साळे गल्ली भागात मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने गरजू लोकांना मोफत भाजीपाला वाटप सुरू केला होता़ ही माहिती परिसरात कळताच लोकांनी मोठी गर्दी केली़ त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला़ इथे ना सोशल डिस्टन्स, ना कुणाच्या आरोग्याची काळजी़ याबाबत काही सजग नागरिकांनी हा प्रकार मनपाचे क्षेत्रिय अधिकारी बंडू किसवे यांना सांगितला़ भाजी घेण्यासाठी महिलांसह मुलेही रांगेत उभी होती़ शेकडो लोक रस्त्यावर आल्याचे सांगण्यात आल्याने किसवे यांनी तात्काळ विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सदरील माहिती देत पोलिसांना पाचारण केले़ घटनास्थळी पोलिस दाखल होताच नागरिकांनी पळ काढला़ काही वेळातच गर्दी पांगविण्यात आली़ तद्नंतर पोलिसांनी संयोजकाला समज दिली़ 

मदत करायची तर घरपोच करा़़़
लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाºया अनेक मजुरांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ अशाच लोकांचा शोध घेऊन सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवी संस्था घरपोच धान्य पुरवठा करीत आहेत़ अशा लोकांना महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासन सहकार्य करीत आहे, ज्यांना मदत करायची आहे, त्यांनी गरजवंतांना शोधून मदत करा़ एकाच ठिकाणी गर्दी होईल असे कृत्य करू नये़ स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, असा सल्ला यावेळी क्षेत्रिय अधिकारी बंडू किसवे यांनी दिला़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर