काेराेनाची ‘भाकरी’वरच संक्रांत, २५ हजार माेलकरणींना ‘दार’ बंद ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:07+5:302021-04-14T04:18:07+5:30

घर कसे चालवायचे याचीची चिंता... लातूर जिल्ह्यातील तब्ब्ल २५ हजार माेलकरणींच्या हातचे काम काेराेनाच्या काळात गेले आहे. परिणामी, त्यांना ...

Concerning Kareena's 'bread' only, 'doors' closed to 25,000 males. | काेराेनाची ‘भाकरी’वरच संक्रांत, २५ हजार माेलकरणींना ‘दार’ बंद ।

काेराेनाची ‘भाकरी’वरच संक्रांत, २५ हजार माेलकरणींना ‘दार’ बंद ।

Next

घर कसे चालवायचे याचीची चिंता...

लातूर जिल्ह्यातील तब्ब्ल २५ हजार माेलकरणींच्या हातचे काम काेराेनाच्या काळात गेले आहे. परिणामी, त्यांना घर कसे चालवायचे हाच यक्ष प्रश्न सतावत आहे. याच चिंतेने अनेक कुटुंबीयांची परवड सुरु झाली आहे. त्यासाठी घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ-कायदा २००८ मध्ये अस्तित्वात आला. मात्र, या कायद्याची अंमलबजावीण हाेताना दिसून येत नाही. काेराेनाच्या काळात मालकरणी, घरेलू कामगारांना शासनाकडून विशेष अनुदान देण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची मागणी हाेत आहे.

एका कामासाठी ८०० रुपये...

घरकामामध्ये धुणी, भांडी आणि साफसफाइ अशी वर्गवारी आहे. प्रति कामाला महिन्याकाठी ८०० रुपये माेबदला मिळताे. काही ठिकाणी हे तीनही आणि पूर्णवेळ काम मिळते. तेथे माेलकरणीस ३ ते ४ हजारांचा माेबदला दिला जाताे. एका माेलकरणीस किमान चार ते पाच घरचे काम करावे लागते. तेव्हा कुठे घरप्रपंच भागताे. एक महिला किमान महिन्याला ५ ते ६ हजार रुपये ओढाताण करुन कमवते. याच तुटपुंज्या अर्थकारणावरच कुटुंबाचा गाडा हाकला जाताे. आता मात्र, काेराेनाला या गाड्यालाच खिळ बसली आहे.

सह जणांचे पाेट भरणार कसे...

आमच्या घरात चार मुले आणि आम्ही दाेघे असे एकूण सहा जण आहाेत. पती मिळेल ते काम करात असत आणि मी घरकाम करत असे. आमच्या दाेघांच्या मेहनतीतून घर भागत हाेतं. मात्र, काेराेनाने आमच्या हातचे कामच गेले आहे. अशा संकटसमयी जगायचं कसं, हाच प्रश्न आम्हाला रात्रं-दिन सतावत आहे. शासनाने तातडीने अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे.

सुनिताबाइ, कामगार

मी विधवा, परितक्त्या आहे. लातुरात मी एकटीच राहते. मुलांच्या शिक्षणासाठी मी घरकाम करत हाेते. आता ते कामही काेरानाच्या महामारीने बंद आहे. अशा स्थितीत जगणार कसे, हा गंभीर प्रश्न आहे. मुलांचे शिक्षणही आता थांबले आहे. महिन्याकाठी मिळणारे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने, दाेनवेळच्या भाकरीचे वांदे झाले आलेत.

अनिताबाइ, कामगार

लातूर शहरात मी गेल्या अनेक वर्षांपासून घरकाम करुन घरप्रपंच चालविते. गत मार्चपासून हे कामच बंद झाले आहे. चार-पाच घरातील धुणी-भांडी केल्यानंतर मला जवळपास ५ हजार रुपये मिळायचे. त्यावरच आमचा उदर्निवाह चालायचा. काेराेनाने आमच्या पाेटावरच टाच आणली आहे. शासनाने तातडीने अनुदान देवून आधार द्यावा, अशी मागणी आहे.

गाेजरबाइ, कामगार

Web Title: Concerning Kareena's 'bread' only, 'doors' closed to 25,000 males.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.