पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीच्या हिशेबाची तक्रार! सोशल मीडियावर चर्चा, पोलिसांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 01:04 IST2026-04-29T01:03:50+5:302026-04-29T01:04:20+5:30

  लातूर : संतांच्या पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीचा हिशेब आयोजनातील एका महाराजांनी दिला नसल्याची तक्रार २८ एप्रिल राेजी जिल्हा ...

Complaint about accounting of fees in Paduka Darshan festival! Discussion on social media, statement to the police | पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीच्या हिशेबाची तक्रार! सोशल मीडियावर चर्चा, पोलिसांना निवेदन

प्रतिकात्मक फोटो...

 

लातूर : संतांच्या पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीचा हिशेब आयोजनातील एका महाराजांनी दिला नसल्याची तक्रार २८ एप्रिल राेजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली आहे. मात्र याबाबत अद्यापि पोलिसांत गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

निवेदनात म्हटले आहे, लातूर येथे २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या काळात खंडापूर शिवारात संतांचा पादुका दर्शन साेहळा व सप्ताह पार पडला हाेता. त्यामध्ये काेट्यवधींचा खर्च झाला हाेता. मात्र साेहळ्याच्या आयोजनात असलेल्या एका महाराजांनी उरलेल्या रकमेचा हिशेब दिला नाही. या सोहळ्यातून उरलेली रक्कम भंडारा डाेंगर येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे काम सुरु आहे, त्या मंदिर बांधकामाला देण्यात यावी, असे ठरले हाेते. परंतू, ते महाराज फाेन उचलत नाहीत. आम्हाला ते भेटत नाहीत.

निवेदनाद्वारे शाम भारतराव बरुरे, हभप. निलेश महाराज चव्हाण, किल्लारीकर, हभप. बाबा महाराज बाेराडे, दिलीप महाराज वलसे, चंद्रकांत ज्ञानाेबा आरडले यांनी ही तक्रार दिली आहे. दरम्यान बंदूकीच्या फोटोचीही सोशल मीडियात दिवसभर चर्चा झाली. 

गुन्हा दाखल करण्याची मागणी...
या प्रकरणात चाैकशी करुन गुन्हा नाेंद करावा, या मागणीसाठी शाम बरुरे महाराजांसह इतर महाराजांनी जिल्हा पाेलिस अधीक्षकांना निवदेन दिले आहे. तर सबंधित महाराजांनी, मी काहीही केले नाही, कोणत्याही चौकशीला समोर जाऊ. हे माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

Web Title : लातूर में पादुका दर्शन कार्यक्रम के धन को लेकर शिकायत दर्ज

Web Summary : लातूर में पादुका दर्शन कार्यक्रम के धन का हिसाब न देने की शिकायत दर्ज। आयोजकों ने मंदिर को दान करने का अनुरोध किया। पुलिस जांच की मांग की गई। महाराज ने इसे साजिश बताते हुए गलत काम से इनकार किया।

Web Title : Complaint Filed Over Funds From Paduka Darshan Event in Latur

Web Summary : A complaint alleges a Maharaj failed to account for funds from a Paduka Darshan event in Latur. Organizers want remaining funds donated to a temple. Police investigation is requested. Maharaj denies wrongdoing, calling it a conspiracy.