शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

दिलासादायक ! अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात १२५ कोटी निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 3:57 PM

relief to farmers खरीप हंगामाच्या शेवटी लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, उदगीर आदी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात १२९ कोटी रुपये प्राप्त झाले होते.शेतकऱ्यांना लवकरच निधी मिळणार आहे.निलंगा, अहमदपुरातील सर्वाधिक शेतकरी...

लातूर : गतवर्षी खरीप हंगामाच्या शेवटी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात १२९ कोटी रुपये प्राप्त झाले होते. सदरील मदत १ लाख ८८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा होती. राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील १२५ कोटी १५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच निधी मिळणार आहे.

खरीप हंगामाच्या शेवटी लातूर, औसा, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, उदगीर आदी तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. जवळपास अडीच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्याखाली गेले होते. त्यापैकी ३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी प्रशासनाने राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १२८ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त झाले होते. या निधीचे १ लाख ८८ हजार ७१७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकास्तरावर निधी वर्ग केला जाणार आहे. त्यानुसार गावनिहाय मदतीचे वाटप केले जाणार असल्याचे महसूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

निलंगा, अहमदपुरातील सर्वाधिक शेतकरी...पहिल्या टप्प्यात अनुदान वितरीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये लातूर ५९४, औसा ३५ हजार ३११, रेणापूर ६११, निलंगा ४० हजार ७३१, शिरूर अनंतपाळ ११ हजार ९३२, देवणी १४ हजार ७०४, उदगीर २३ हजार ८१०, जळकोट १२ हजार १०५, अहमदपूर २७ हजार ३७३ तर चाकूर तालुक्यातील २१ हजार ५४६ अशा एकूण १ लाख ८८ हजार ७१७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये निलंगा आणि अहमदपूर तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत. जिल्ह्यात जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते. त्यामध्ये ३ लाख ८५ हजार शेतकरी असून, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसlaturलातूरfundsनिधी