शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

औरादमध्ये ढगफुटी; दीड तासांमध्ये १२० मि.मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 18:57 IST

गावात अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्देतेरणा नदीवरील सात बंधाऱ्यांची दारे उघडलीजामखंडी रस्त्यावरील पुलावर पाण्याच्या प्रवाहाने ट्रक उलटला

औराद शहाजानी (जि. लातूर) : औरादसह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले असून, दीड तासांमध्ये १२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाण्याचा विसर्ग मोठा असल्याने तेरणा नदीवरील सात बंधाऱ्यांची दारे उघडण्यात आली आहेत. 

औराद परिसरात झालेल्या या मोठ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे ससारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. जुने गाव व नवीन वस्त्यांतील बांधलेल्या नाल्या तुंबल्या होत्या. अभिनव कॉलनीत अनेकांच्या घारात पाणी शिरले. राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग ७५२ क्रमांकाचे काम संथगतीने सुरू असून, पावसाचा फटका यालाही बसला आहे. मांजरा नदीवरील वांजरखेडा व तेरणा नदीवरील तगरखेडा, औराद, सोनखेड, गुंजरगा, लिंबाळा, किल्लारी, मदनसुरी येथील उच्चस्तरीय बंधाऱ्यांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

महामार्गाला नदीचे स्वरुप... लातूर-जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरुप आले असून, कमरेपर्यंत पाणी वाहत आहे. या पाण्यामध्ये अनेकांचे संसारोपयोगी व व्यापाऱ्यांचे साहित्य वाहून गेले. खत गोडावून, हॉटेल, दवाखाना, किराणा आदी दुकानांमध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. 

 

टॅग्स :laturलातूरRainपाऊस