घरात घुसून मारहाण; सव्वा लाखाचा ऐवज केला लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:10+5:302021-09-21T04:22:10+5:30

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी रेवनआप्पा उर्फ रमेश राजप्पा शेरीकर यांच्या पुतण्यास विजय बाबूराव राठोड याने भांडण करून मारहाण केल्याच्या ...

Burglary; Lampas was robbed of Rs | घरात घुसून मारहाण; सव्वा लाखाचा ऐवज केला लंपास

घरात घुसून मारहाण; सव्वा लाखाचा ऐवज केला लंपास

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी रेवनआप्पा उर्फ रमेश राजप्पा शेरीकर यांच्या पुतण्यास विजय बाबूराव राठोड याने भांडण करून मारहाण केल्याच्या कारणावरून गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरात घुसून आरोपींनी फिर्यादी व त्याच्या नातेवाइकास लोखंडी रॉड व काठीने मारून गंभीर दुखापत करून फिर्यादीच्या भावाच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे लाॅकेट व हातातील अंगठी काढून घेऊन फिर्यादीचा भाऊ संतोष शेरीकर यास जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर दुखापत केली. तसेच फिर्यादीच्या घरावर दगडांनी मारा करून काचा फोडून ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने विजय बाबूराव राठोड, अंकुश बाबूराव राठोड, बाळू बाबूराव राठोड, प्रकाश बाबूराव राठोड, बाबूराव राठोड, लखन सुभाष राठोड, विलास मारुती राठोड, विजय शिवाजी जाधव, अविनाश सुभाष राठोड, विकास राठोड व इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले करीत आहेत.

Web Title: Burglary; Lampas was robbed of Rs