राष्ट्रवादी काँग्रेसचा गाव तिथे शाखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST2021-09-21T04:21:57+5:302021-09-21T04:21:57+5:30

शिरूर अनंतपाळ तालुक्याची निर्मिती होऊन जवळपास २० वर्षे उलटले आहेत, तरीही तालुक्याचा अपेक्षित विकास झाला नाही. एवढेच नव्हे, तर ...

Branch activities of NCP's village there | राष्ट्रवादी काँग्रेसचा गाव तिथे शाखा उपक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचा गाव तिथे शाखा उपक्रम

शिरूर अनंतपाळ तालुक्याची निर्मिती होऊन जवळपास २० वर्षे उलटले आहेत, तरीही तालुक्याचा अपेक्षित विकास झाला नाही. एवढेच नव्हे, तर येथे अनेक कार्यालये सुरू झाली नाहीत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना स्वतःची कामे करण्यासाठी आजही उदगीर, देवणी, निलंगा अशा तीन-तीन तालुक्याला जावे लागत आहे. त्यातच ग्रामीण भागात आजही अनेक मूलभूत सोईसुविधांचा अभाव, त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या समस्या जाणून घेऊन रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या पुढाकाराने ‘गाव तेथे राष्ट्रवादीची शाखा’ हा उपक्रम सुरू केला आहे. दोन दिवसांत तालुक्यातील चार गावांत शाखेची स्थापना केली आहे.

चार गावांत शाखांची स्थापना...

गाव तिथे राष्ट्रवादीची शाखा उपक्रमांतर्गत तालुक्यातील कारेवाडी, धामणगाव, कळमगाव, तळेगाव बो. या गावांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, शहराध्यक्ष नंदकुमार तांबोळकर, युवक तालुकाध्यक्ष राजीव बर्गे, महेताब शेख, अब्दुल अजीज मुल्ला, ज्ञानोबा मोगले, गोविंद शेळगे, ओम जगताप, विवेक घारूळे, ऋत्विक सांगवे, ज्ञानेश्वर कोरे, रवि धुमाळ, तानाजी दाडगे, जहिरोद्दीन शेख, अशोक चोचंडे, नामदेव भुरे, बाळू भालेकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Branch activities of NCP's village there