शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये भरवस्तीत रक्ताचा सडा! भंगार गोळा करणाऱ्या वृद्धाची डोक्यात फरशी घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:00 IST

लातुरात किरकोळ वादातून वृद्धाचा थरारक अंत; संशयित आरोपीची ओळख पटली, पोलीस मागावर.

लातूर: शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कावळेनगर परिसरात बुधवारी सकाळी एका ६५ वर्षीय वृद्धाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विठ्ठल सोपान ससाणे (मूळ रा. मुगाव, ता. चाकूर) असे मृताचे नाव असून, ते शहरात भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या डोक्यात लाकडी दांडा आणि फरशीच्या तुकड्याने जबर प्रहार करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवली असून, त्याला पकडण्यासाठी विशेष पथके जिल्ह्याबाहेर रवाना झाली आहेत.

अज्ञात कारणावरून वाद अन् जीवघेणा हल्लाप्राथमिक माहितीनुसार, विठ्ठल ससाणे आणि आरोपीमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणावरून वाद झाला असावा. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने ससाणे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर झालेल्या गंभीर वारामुळे ससाणे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

आरोपीची ओळख पटली; तपासाला गतीशिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने संशयित आरोपीची ओळख पटविण्यात यश मिळविले आहे. "आरोपीच्या अटकेसाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याची पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्याला गजाआड केले जाईल," असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही हत्या जुन्या भांडणातून झाली की ऐनवेळी उद्भवलेल्या वादातून, याचा खुलासा आरोपीच्या अटकेनंतरच होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Elderly Scrap Collector Brutally Murdered; Panic Grips the Area

Web Summary : A 65-year-old scrap collector, Vitthal Sasane, was murdered in Latur. He was attacked with a wooden stick and stone. Police have identified the suspect and dispatched teams to apprehend him. The motive remains unclear, pending the arrest.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर