जिल्ह्यात ८९ जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:26+5:302021-01-04T04:17:26+5:30

२०१९ मधील जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात नऊ घटना सर्पदंशाच्या घडल्या. मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये २५ जणांना सर्पदंश ...

89 people were bitten by snakes in the district | जिल्ह्यात ८९ जणांना सर्पदंश

जिल्ह्यात ८९ जणांना सर्पदंश

२०१९ मधील जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात नऊ घटना सर्पदंशाच्या घडल्या. मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये २५ जणांना सर्पदंश झाला. मात्र, याही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या चार महिन्यांमध्ये २९ जणांना सर्पदंश झाला. सुदैवाने २०१९ मध्ये झालेल्या घटनांमध्ये एकही मृत्यू नाही.

दरम्यान, २०२० मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यांत ११ जणांना, मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये १९, तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या चार महिन्यांत १६ जणांना चावा घेतला. मात्र, या सर्वांना वेळेत उपचार मिळाल्याने जीवितहानी झाली नसल्याची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोंद झाली आहे.

साप चावताच दवाखाना गाठणे आवश्यक

साप चावल्यानंतर वरच्या बाजूला दोरीने घट्ट बांधणे आणि तात्काळ दवाखाना गाठणे आवश्यक. सापाचे विष शरीरात तात्काळ उतरू नये म्हणून ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. शिवाय, घाबरून जाऊ नये. दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. साप चावल्यानंतर सूज येणे, रक्ताभिसरणावर परिणाम होणे आणि मसलवर परिणाम होतो. त्यासाठी तात्काळ दवाखाना गाठणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे म्हणाले.

जिल्ह्यात औषधीसाठा मुबलक

शेतात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत साप निघतात. उन्हाळ्यामध्येही साप निघण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आढळणारे साप बहुतांश बिनविषारी आहेत. त्यासाठी औषधसाठा मुबलक आहे.

Web Title: 89 people were bitten by snakes in the district