महापालिका निवडणुकीत ८० टक्के तरुणांना उमेदवारी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:36+5:302021-09-07T04:25:36+5:30

लातूर येथील अनुसया मंगल कार्यालयात एकता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कोरोनाकाळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत ...

80 per cent youth will be given candidature in municipal elections | महापालिका निवडणुकीत ८० टक्के तरुणांना उमेदवारी देणार

महापालिका निवडणुकीत ८० टक्के तरुणांना उमेदवारी देणार

लातूर येथील अनुसया मंगल कार्यालयात एकता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कोरोनाकाळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकता प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. प्रेरणा होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिष्ठान काम करत आहे. लातूर शहरात कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा व व्यक्तींचा सन्मान प्रतिष्ठानकडून करण्यात आला. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामुळे रेल्वे कोच फॅक्टरी आली असून, येणाऱ्या काळात या कोचच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे होनराव यांनी सांगितले. यावेळी प्रतिष्ठानचे विजय कसपटे, वैभव पतंगे, आकाश मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: 80 per cent youth will be given candidature in municipal elections