शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसांना ४ लाखांचा धानादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

अहमदपूर तालुक्यातील हगदळ येथील मल्हारी कांबळे हे शेतात मजूरीसाठी गेले होते. दरम्यान, संततधार पावसाने नदी-नाले तुडूंब वाहत होते. ...

अहमदपूर तालुक्यातील हगदळ येथील मल्हारी कांबळे हे शेतात मजूरीसाठी गेले होते. दरम्यान, संततधार पावसाने नदी-नाले तुडूंब वाहत होते. या पावसाच्या पाण्याने हगदळ येथील साठवण तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत हाेते. पाण्याचा वेग असल्याने त्यांना अंदाज आला नाही. या पाण्यातच मल्हारी कांबळे हे वाहून गेले. यातच त्यांचा मृत्यू झाला. आ. बाबासाहेब पाटील यांनी हगदळ येथे त्यांच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले हाेते. आ. बाबासाहेब पाटील यांनी तहसीलदारांना सूचना केल्या. कांबळे कुटुंबियांना आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ४ लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. कांबळे कुटुंबातील कर्ता व्यक्ती मयत मल्हारी कांबळे होते. या घटनेने त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी झाली. त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी आ. पाटील यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर मयताची पत्नी रंजना कांबळे यांना मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निवृत्तीराव कांबळे, जि.प. सदस्य माधवराव जाधव, सरपंच बाळू मुंडे, माधव भोसले, दयानंद पाटील, श्याम पाटील, नबी सय्यद, युवराज पाटील, संग्राम गायकवाड यांची उपस्थिती हाेती.

फोटाे कॅप्शन : पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसांना ४ लाख रुपयांचा धनादेश आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती हाेती.