पांढरवाडी ओढ्यावरील पुलासाठी दीड कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:35+5:302021-05-01T04:18:35+5:30

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील पांढरवाडी ओढ्यावरील बाॅक्स सेल पुलाच्या बांधकामासाठी पाटबंधारे विभागाकडून दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ...

1.5 crore sanctioned for bridge over Pandharwadi stream | पांढरवाडी ओढ्यावरील पुलासाठी दीड कोटी मंजूर

पांढरवाडी ओढ्यावरील पुलासाठी दीड कोटी मंजूर

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील पांढरवाडी ओढ्यावरील बाॅक्स सेल पुलाच्या बांधकामासाठी पाटबंधारे विभागाकडून दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे बांधकामासाठी खोदकाम सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे.

शिरूर अनंतपाळ- उदगीर राज्य मार्गावरील पांढरवाडी ओढ्यावर पाझर तलाव असून येथील सिमेंट पुलाची उंची कमी आहे; परंतु पाझर तलाव भरल्यानंतर पावसाळ्यात राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती. तसेच शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. त्यामुळे मोठा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत होती. पाटबंधारे विभागाने ओढ्यावर बॉक्स सेल पुलासाठी दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सध्या संचारबंदी असली तरी अत्यावश्यक सेवेसाठी या राज्य मार्गावरून वाहतूक सुरू आहे. रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने बाजूचा रस्ता तयार करण्यात आला असल्याचे उपविभागीय अभियंता रवींद्र पवार यांनी सांगितले.

पुलाचे बांधकाम नियोजित वेळेत...

या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने नियोजित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. वेळेत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या असल्याचेही उपविभागीय अभियंता पवार यांनी सांगितले.

Web Title: 1.5 crore sanctioned for bridge over Pandharwadi stream