शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेचे धिंडवडे! रुग्णवाहिकेचा पार्ट तुटला; गंभीर रुग्ण भररस्त्यात अर्धा तास तळमळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 20:23 IST

मुरुडमध्ये आपत्कालीन रुग्णवाहिकेचा 'ब्रेकडाऊन'; खासगी रुग्णवाहिकेने रुग्णाला लातूरला हलवले.

मुरुड (जि. लातूर) : विजेच्या धक्क्यामुळे गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णाला उपचारासाठी लातूरला नेताना आपत्कालिन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा पार्ट तुटला. त्यामुळे वेदनेने व्याकूळ रुग्ण अर्धा तास तळमळल्याची घटना शनिवारी दुपारी मुरुड बस स्थानकाजवळ घडली. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेवर संताप व्यक्त होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील वाठवाडा (ता. कळंब) येथील बालाजी कोकाटे हे शनिवारी शेतात काम करीत होते, तेव्हा त्यांना अचानक विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचे दोन्ही हात, छाती, पोट व पायाजवळचा काही भाग जळाला. उपचारासाठी नातेवाइकांनी खासगी वाहनाने मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. प्रथमोचारानंतर दुपारी २ वा. च्या सुमारास अत्यवस्थ कोकाटे यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे लातूरला पाठविण्यात येत होते. रुग्णालयापासून केवळ २०० मीटर अंतरावरील बस स्थानकाजवळ रुग्णवाहिका गेली असता, रस्त्यातच रुग्णवाहिकेचा खालचा रॉड तुटून पडला. त्यामुळे रुग्णवाहिका बंद पडली. चालक व रुग्णवाहिकेतील डॉ. पाटील यांनी रुग्णाच्या नातेवाइकांच्या मदतीने रुग्णवाहिका रस्त्यातून बाजूला घेतली. मात्र, रविराजाच्या रौद्ररूपामुळे रुग्ण वेदनांनी विव्हळत होता.

दरम्यान, ही माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुकेश सवासे, सूरज कांबळे, समाधान गायकवाड यांना समजताच त्यांनी तत्काळ धाव घेऊन रुग्णाच्या नातेवाइकांना धीर दिला. रुग्णवाहिकेच्या वरिष्ठांशी बोलून दुसरी रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती केली. मात्र, बराच वेळ लागत असल्याचे पाहून एका खासगी रुग्णवाहिकेद्वारे लातूरला पाठविले.

अर्धा तास उन्हात...गंभीर रुग्णाला प्रचंड उन्हात जवळपास अर्धा तास रस्त्यावरच होता. त्यामुळे नातेवाईक व नागरिकांतून संताप व्यक्त होऊन रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

गलथान कारभाराबाबत प्रशासनाला जाब...युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पत्रकार मनोज जोशी यांनी तत्परता दाखवित रुग्णांच्या मदतीसाठी धावले. त्यांची ही संवेदनशीलता, जबाबदारी आणि माणुसकी कौतुकास्पद असल्याची भावना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आ. धीरज देशमुख यांनी कौतुक केले. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामीण भागातील रुग्णवाहिकांची सखोल तांत्रिक तपासणी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ambulance Breakdown Leaves Severely Burned Patient Stranded, Service Questioned

Web Summary : A severely burned patient was left stranded for half an hour after an ambulance broke down near Murud. The incident raises serious concerns about the reliability of emergency medical services and prompts calls for investigation.
टॅग्स :laturलातूर