सदलगातील चाकू हल्ल्यात पोर्लेचा युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:17+5:302021-09-23T04:26:17+5:30

मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करणाऱ्या सदलग्यातील गणेशोत्सवाला या खुनी हल्ल्याने गालबोट लागले असल्याचे चर्चा परिसरात सुरू आहे. अधिक ...

The youth of Porle was seriously injured in the knife attack | सदलगातील चाकू हल्ल्यात पोर्लेचा युवक गंभीर जखमी

सदलगातील चाकू हल्ल्यात पोर्लेचा युवक गंभीर जखमी

मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करणाऱ्या सदलग्यातील गणेशोत्सवाला या खुनी हल्ल्याने गालबोट लागले असल्याचे चर्चा परिसरात सुरू आहे.

अधिक माहिती अशी, कर्नाटकातील सदलगा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मंगळवारी (दि. २१) करण्यात आले. गणेशमूर्तीचे विसर्जन मिरवणुकीत वाद्यांच्या ठेक्यावर विद्युत रोषणाईच्या झगमगाटात मधहोश होऊन तरुणाई थिरकत होती. साधारण रात्री साडेआठच्या सुमारास प्रभाकर गार्डन परिसरातील कल्पवृक्ष सोसायटीच्या परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गर्दीतील तरुणांमध्ये अचानक वादावादी सुरू झाली. यात विशाल शेवडे यांच्यावर चारपाच अज्ञातांनी चाकूने हल्ला केला. हल्ल्यात त्याच्या पोटावर आणि पाठीवर पाच वार करून त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मंगळवारी दुपारी विशाल शेवडे आणि रणजीत पानारी दोघेजण सदलगा येथे मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. हल्ल्यानंतर विशाला बेळगावला उपचारासाठी नेण्यात आले होते ; परंतु मित्रांनी त्याला मध्यरात्री उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात आणले. बुधवारी सदलगा पोलिसांनी त्याचा मित्र रणजीत आणि त्यांच्या नातेवाईकांकडे कसून चौकशी केली. घटनेचा सदलगा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: The youth of Porle was seriously injured in the knife attack