शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

सेनापती कापशीजवळ अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:32 IST

सेनापती कापशी : येथील मेहता डेअरीजच्या चिलिंग सेंटरनजीक दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर तिघेजण ...

सेनापती कापशी : येथील मेहता डेअरीजच्या चिलिंग सेंटरनजीक दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले. या अपघात अक्षय प्रकाश पाटील (वय २७, रा. हसूर खुर्द, ता. कागल) हा तरुण ठार झाला तर अमित हंचनाळे (रा. ठाणेवाडी), संजय केशव पाटील व पांडुरंग दशरथ पाटील (दोघेही रा. बेलेवाडी काळम्मा) हे तिघे गंभीर जखमी झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय पाटील व पांडुरंग पाटील हे हमीदवाडा कारखान्याचे कर्मचारी कामावरून घरी येत होते तर अक्षय पाटील व अमित हंचनाळे हे कामानिमित्त नंद्याळकडे चालले होते. नंद्याळ कापशी रस्त्यावर मेहता डेअरीच्या चिलिंग सेंटरजवळ धोकादायक वळण आहे. याठिकाणी दुचाकीस्वारांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये अक्षय पाटील हा जागीच ठार झाला. जखमीवर गडहिंग्लज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अक्षयने एम.एस.सी पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. येत्या काही दिवसांतच तो कंपनीत हजर होणार होता. त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

फोटो. अक्षय पाटील