शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन पुन्हा मिळवून देणारच

By admin | Updated: August 29, 2015 00:35 IST

संजय मंडलिक : मुरगूडमध्ये पेन्शनधारकांचा भव्य मोर्चा

मुरगूड : मुरगूडमध्ये शुक्रवारी शिवसेना व मंडलिक युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शनधारकांसाठी काढण्यात आलेला मोर्चा हा केवळ इशारा मोर्चा आहे. कोणी म्हणते म्हणून पेन्शन बंद केली असेल तर त्या सर्व पेन्शनधारकांना पेन्शन मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.यावेळी गाव चावडीवर काढण्यात आलेला मोर्चा नाका क्र. १ पासून सुरूझाला. बाजारपेठेतून तुकाराम चौकामार्गे अंबाबाई मंदिर अशा मार्गाने महिलांसह मोठ्या संख्येने पेन्शनधारक सहभागी झाले होते. आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांना देण्यात आले.मंडलिक म्हणाले, समाजातील दिन-दुबळ्या व ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळावा म्हणून शासनाने संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजना लागू केल्या आहेत; पण मात्र वंचिताना प्रत्यक्ष लाभ होतच नाही अशा वंचित लोकांचा या योजनेत समावेश करावा. कोणीतरी सांगतेय म्हणून या योजनेतील लाभार्थ्यांना चौकशीच्या नोटिसा लागू केल्या आहेत. या नोटिसा ताबडतोब रद्द करून चौकशी थांबवावी. काही पेन्शन धारकांच्या अंगठ्यावरचा ठसा मशीन स्वीकारत नाही. अशांची पेन्शन बंद होऊन रोजी -रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशांची पेन्शन पूर्वरत सुरू करावी, रेशन धान्य लाभार्थ्यावरीलही जाचक अटी शिथिल करून वंचिताना न्याय द्यावा. उत्पादनाचे दाखले तलाठ्याकडे मिळावेत. यासाठी आजचा मोर्चा हा फक्त इशारा देण्यासाठी आहे. पालकमंत्री यांना भेटून पेन्शनधारकांची गाऱ्हाणे मांडणार असून, वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.यावेळी सभापती भूषण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बिद्री कारखान्याचे संचालक राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, नामदेव मेंडके, पांडुरंग भाट, किरण गवाणकर, सुहास खराडे, सर्जेराव पाटील, आर. डी. पाटील, आनंदा फराकटे यांच्यासह परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीरेंद्र मंडलिक यांनी आभार मानले.