यल्लम्मा देवस्थान दर्शनासाठी होणार खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:28+5:302021-02-05T06:53:28+5:30

येत्या १ फेब्रुवारीपासून हे देवस्थान दर्शनासाठी खुले करण्यात येण्याची तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

Yallamma Devasthan will be open for Darshan | यल्लम्मा देवस्थान दर्शनासाठी होणार खुले

यल्लम्मा देवस्थान दर्शनासाठी होणार खुले

येत्या १ फेब्रुवारीपासून हे देवस्थान दर्शनासाठी खुले करण्यात येण्याची तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देवस्थान बंद होती; परंतु भक्तांच्या मागणीचा विचार करून येत्या १ फेब्रुवारीपासून ही देवस्थान खुली करण्याचा विचार जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यल्लम्मा देवस्थानात कर्नाटकासह गोवा आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यामुळे उद्या याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे.

कार -दुचाकी अपघातात विद्यार्थी जागीच ठार

बेळगाव : कार आणि मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार विद्यार्थी जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी दुपारी केएलई रोडवरील केएफसीसमोर घडली.

साईराज संभाजी कडोलकर (वय २२, रा. काकती) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. साईराज हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. शहरातील आरएलएस महाविद्यालयामध्ये त्याने बीएस्सीसाठी ॲडमिशन घेतले होते. साईराज आपल्या दुचाकीवरून आज दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास बेळगावहून काकतीच्या दिशेने भरधाव वेगात निघाला होता. त्यावेळी जिल्हा क्रीडांगणाकडून मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या कार गाडीला त्याने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, साईराज याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी रहदारी उत्तर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Yallamma Devasthan will be open for Darshan