शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठातर्फे रविवारी लेखी परीक्षा

By admin | Updated: December 17, 2014 22:57 IST

६४ जागांचा समावेश : वर्ग-३, वर्ग-४ पदांच्या होणार भरती

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ‘वर्ग-३’ व ‘वर्ग-४’ च्या पदभरतीची लेखी परीक्षा रविवारी (दि. २१) घेण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठीच्या वेबसाईटवर उपलब्ध असून, उमेदवारांनी ती पहावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठात भांडारपाल, तंत्रज्ञ कम प्रयोगशाळा, सहायक, लघुलेखक, सांख्यिकी सहायक, ओव्हरसिअर (आवेक्षक), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, गार्डन असिस्टंट, कनिष्ठ सहायक, प्रकल्प अधिकारी, अभिरक्षक, चित्ररक्षक सहायक, डाटा एंट्री आॅपरेटर, वाहनचालक, पंप आॅपरेटर, सहायक प्लंबर आणि शिपाई अशा सर्व मिळून एकूण ६४ जागांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूरमधील विविध केंद्रांवर ती होईल. वर्ग-४ साठीची परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत होईल, तर वर्ग-३ साठीची परीक्षा केंद्रनिहाय व बैठक क्रमांक निहाय बैठक व्यवस्थेची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या ६६६.४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल/१ीू१४्र३ेील्ल३२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी आपली बैठक व्यवस्था कोणत्या केंद्रावर आहे, ते पाहावे. पात्र उमेदवारांना त्यांचे लेखी परीक्षेस उपस्थित राहणेबाबतचे पत्र पोस्टाने पाठविण्यात आले आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन पात्र उमेदवारांच्या यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी. तसेच, त्यानंतर आपला परीक्षा बैठक क्रमांक, परीक्षा केंद्र, आदी माहिती संकेतस्थळावरून घ्यावी आणि त्यानुसार परीक्षेस उपस्थित राहावे. परीक्षेस उपस्थित राहताना आपले छायाचित्र असलेले कोणतेही शासनमान्य ओळखपत्र (जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आदी ) सोबत ठेवावे, असे आवाहनही कुलसचिव मुळे यांनी केले आहे.