केंद्रशाळा दिंडेवाडीच्या शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:41+5:302021-02-23T04:37:41+5:30

पांगिरे : केंद्रशाळा दिंडेवाडी (ता. भुदरगड)चे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व सर्व आजी-माजी विद्यार्थी ...

The work of the teachers of Kendrashala Dindewadi is commendable | केंद्रशाळा दिंडेवाडीच्या शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद

केंद्रशाळा दिंडेवाडीच्या शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद

पांगिरे : केंद्रशाळा दिंडेवाडी (ता. भुदरगड)चे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व सर्व आजी-माजी विद्यार्थी यांच्या समन्वयातून केलेला शैक्षणिक उठाव त्याचबरोबर शासकीय निधीचा केलेला उत्तम विनियोग सर्वांनाच आदर्शवत आहे, तसेच शिक्षकांचे काम आदर्शवत व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जि. प. सदस्या रोहिणी आबिटकर यांनी केले. त्या दिंडेवाडी येथील शाळेस सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होत्या.

माजी सभापती स्नेहल परीट यांनी शाळेच्या कामाचे कौतुक केले. तसेच गावोगावी मंदिरे आकर्षक होण्याबरोबरच संस्कार देणारी ज्ञान मंदिरेदेखील अशीच सुंदर झाली पाहिजेत.

यावेळी शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक संजय गुरव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्या फंडातून मंजूर झालेल्या नवीन खोलीसाठी साडेआठ लाख रुपये (८,५०,०००) प्रशासकीय मंजुरीचे पत्र देण्यात आले. यापूर्वीदेखील रोहिणी आबिटकर यांच्या फंडातून एक खोली बांधण्यात आली आहे.

या कार्यक्रमास सरपंच श्रीधर भोईटे, उपसरपंच अशोक गुरव, ग्रामपंचायत सदस्य गणेश मोरबाळे, भिकाजी मगदूम, सुरेखा सुतार, शोभा कांबळे शाळा व्यवस्थापन सदस्या सारिका फराकटे, शालन इंदुलकर, अशोक इंदुलकर व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक भीमराव दीक्षित यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गुरव यांनी केले.

Web Title: The work of the teachers of Kendrashala Dindewadi is commendable