सेव्हन स्टार ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:21 IST2021-03-19T04:21:42+5:302021-03-19T04:21:42+5:30

यड्राव : सेव्हन स्टार ग्रुपने परिसरात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक, ज्येष्ठांचा सन्मान, यासह सामाजिक प्रबोधनाचे विविध कार्यक्रम ...

The work of the Seven Star Group is admirable | सेव्हन स्टार ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

सेव्हन स्टार ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

यड्राव : सेव्हन स्टार ग्रुपने परिसरात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक, ज्येष्ठांचा सन्मान, यासह सामाजिक प्रबोधनाचे विविध कार्यक्रम राबवून समाजकार्याची वेगळी संकल्पना कृतीतून उतरवली आहे, हे सर्व कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर यांनी काढले.

ओंकारेश्वर मंदिर येथे सेव्हन स्टार ग्रुपच्या वतीने सत्कार कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाश अकिवाटे होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार, उद्योजक अनिल स्वामी, नसीर अहमद कडेगावकर, उदय कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.

स्वागत सचिन येलाजा यांनी केले. याप्रसंगी उपसरपंच प्राची हिंगे, विनायक शेट्टी, संदीप येलाजा, प्रदीप हिंगे, रोहिणी कुंभार, सरिता शेट्टी, चैताली मगदूम, वर्षा येलाजा, सुरेखा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन भरतेश मगदूम यांनी केले. सचिन मगदूम यांनी आभार मानले.

फोटो - १८०३२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे सेव्हन स्टार ग्रुपच्या वतीने सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर, प्रकाश अकिवाटे, प्राची हिंगे, विनायक शेट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The work of the Seven Star Group is admirable